ता. मुरुड, जि. रायगड
ग्रामविकास, शासकीय योजना आणि पारदर्शक कारभारासाठी उपयुक्त पोर्टल्सची अद्ययावत यादी.
| क्र. | संकेतस्थळाचे नाव | वेबसाईट पत्ता (URL) | उपयुक्तता / माहिती |
|---|---|---|---|
| 1 | ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग (RDD) | rdd.maharashtra.gov.in | सरकारी निर्णय (GRs), अधिसूचना, कायदे आणि ग्रामविकास विभागाच्या सर्व योजनांची अधिकृत माहिती. |
| 2 | पंचायती राज मंत्रालय (MOPR) - केंद्र सरकार | panchayat.gov.in | केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट, केंद्रीय योजना, धोरणे आणि विविध अहवाल. |
| 3 | ई-ग्राम स्वराज (e-Gram Swaraj) | egramswaraj.gov.in | ग्रामपंचायतीच्या योजनेची तयारी, अंमलबजावणी, आर्थिक नोंदी आणि ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) यासंबंधीची माहिती. |
| 4 | महाई-ग्राम (Mahaegram) | mahaegram.co.in | ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सेवा (उदा. जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी), नागरिक सेवा केंद्र (CSC) आणि प्रगती अहवाल. |
| 5 | ग्राम मानचित्र (Gram Manchitra) | grammanchitra.gov.in | ग्रामपंचायत स्तरावरील भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित नकाशे, मालमत्ता तपशील आणि पायाभूत सुविधांचा डेटा. |
| 6 | आरटीएस महाराष्ट्र (RTS) | rts.maharashtra.gov.in | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत वेळेत सेवा मिळवण्यासाठी किंवा विलंब झाल्यास तक्रार नोंदवण्यासाठी. |
| 7 | माहितीचा अधिकार (RTI) महाराष्ट्र | rtionline.maharashtra.gov.in | ग्रामपंचायतीसह कोणत्याही सरकारी विभागाकडून माहिती अधिकाराखाली ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया. |
| 8 | PMAY-G / आवाससॉफ्ट | pmayg.nic.in | प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी याद्या, प्रगती अहवाल आणि घरकुल मंजुरीची स्थिती तपासण्यासाठी. |
2. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा तपशील ( ग्रामपंचायत्याच्या बाहेरील भिंतीवर प्रसिद्ध करणे आवश्यक )
| पद | नाव | पदनाम | दूरध्वनी क्रमांक |
|---|---|---|---|
| जन माहिती अधिकारी | श्री. सुशांत ठाकूर | ग्रामपंचायत अधिकारी | 94203 92828 |
| प्रथम अपिलीय अधिकारी | श्री स्वप्निल म्हात्रे | विस्तार अधिकारी ( प. स. मुरुड ) | |
| द्वितीय अपिलीय अधिकारी | – | मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग | – |
3. भिंतीवर प्रसिद्ध केलेली कोणतीही माहिती ही दिशाभूल करणारी किंवा चुकीची किंवा अद्यावत नसलेली असल्यास जन माहिती अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. नागरिकांना माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 18 अन्वये राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येईल.
लोकसेवा पुरविण्यासाठीची कालमर्यादा ( कामकाजाचे दिवस ) – 7 दिवस
पद निर्दिष्ट अधिकारी – ग्रामपंचायत अधिकारी
प्रथम अपील प्राधिकारी – सहाय्यक गट विकास अधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी – गट विकास अधिकारी